ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण; शिवलिंग सापडल्याचा दावा

ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण; शिवलिंग सापडल्याचा दावा

दिल्ली । Delhi

ज्ञानव्यापी मशिदीत (Gyanvapi masjid survey) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं सर्वेक्षणाचे काम अखेर संपलं आहे. आता बुधवार, १७ मे रोजी या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध पक्षांकडून सर्व प्रकारचे मोठे दावे केले जात आहेत.

या सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीमध्ये विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा जैन यांनी केला आहे. तसेच मशिदीमध्ये नंदीची मूर्तीसुद्धा सापडली आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदू मंदिरांचे अवशेष असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे. यानंतर न्यायालयाने जेथे शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादीच्या वकिलाच्या अर्जावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

दरम्यान ज्ञानवापी सर्वेक्षणानंतर, देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. यासंदर्भात एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाष्य केले आहे. "ज्ञानवापी मशीद होती आणि कयामतपर्यंत राहील इंशा अल्लाह," असे ट्विट ओवेसी यांनी केले आहे.

एवढेच नाही, तर त्यांनी यासोबत एक व्हिडिओ शेअर करत, "आम्ही कुठल्याही प्रकारच्या हातचालाखीला घाबरणार नाही. ती मशीद होती आणि नेहमीसाठी असेन," असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com