
दिल्ली । Delhi
गेल्या ३० वर्षांपासून अर्थात १९९१ सालापासून चालू असणारा ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ मंदिर वाद आता चर्चेत आला आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज सकाळपासून वैज्ञानिक सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले होते.
मात्र ज्ञानवापी मशीद प्रकरणी आठवडाभर उत्खनन होणार नसल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलैपर्यंत सर्वेक्षणावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीला मशीद परिसराच्या ASI सर्वेक्षणाबाबत वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.