भरधाव कारच्या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू; काँग्रेस आमदाराच्या जावयाला अटक

भरधाव कारच्या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू; काँग्रेस आमदाराच्या जावयाला अटक

सुरत | Surat

गुजरातमधील (Gujarat) आनंद जिल्ह्यातील (Anand District) सोजित्राजवळ भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला आहे.

एका भरधाव कारने ऑटो रिक्षा आणि बाइकस्वाराला जोराची धडक दिल्याने अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षातील प्रवासी आणि बाईकस्वाराचा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. (Accident news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार केतन नावाच्या व्यक्तीच्या मालकीची आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत कार चालक केतन रमण पढियार हे सोजित्राच्या काँग्रेस आमदार पूनम परमार यांचे जावई आहेत.

दरम्यान या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापले असून, याप्रकरणी गंभीर दुर्लक्ष झाल्याची चर्चा होती. या घटनेत चालक केतन पढियार याला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आनंदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com