<p>सुरत | Surat</p><p>उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने काही शहरांची नावे बदलली आहे. तर महाराष्ट्रात देखील नामंतरावरून वाद पेटलेला आहे. </p>.<p>दरम्यान, भाजप सरकार असलेल्या गुजरातमध्ये थेट फळाचे नामकरण करण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी ही घोषणा केली.</p>.<p>जगभरात ड्रॅगन फ्रूट नावाने प्रसिद्ध असलेले फळ आता गुजरातमध्ये कमलम म्हणून ओळखले जाणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याचा बाहेरून आकार हा कमळासारखा आहे. त्यामुळेच आता ड्रॅगन फ्रूटचं नाव हे कमलम असं ठेवण्यात आलं आहे. आम्ही चीनशी संबंधित असलेल्या या फळाचं नाव बदललं आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे आणि या फळाचा आकार देखील कमळासारखाच आहे. त्यामुळे आम्ही कमलम असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला" असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे. यामध्ये राजकारणाचा भाग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.</p>