सुरत l Surat

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच त्यांना सौम्य लक्षणं असल्याची माहिती अधिकृत हेल्थ बुलेटीन द्वारा सांगण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी एका कार्यक्रमात स्टेजवरच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना चक्कर आली होती आणि बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्यांना यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह गुजरात भाजपच्या संसदीय बोर्डात सोबत असणारे गुजरात भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांना देखील करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे महामंत्री भीख दलसानीया आणि कच्छचे खासदार विनोद चावडा यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांची देखील चाचणी करण्यात येण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुका २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर २८ फेब्रुवारीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. नगरपालिका निवडणुकांचे निकाल २३ फेब्रुवारीला घोषित केले जातील. तर पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल २ मार्च रोजी लागणार आहेत.