गुजरात पूल दुर्घटना : भाजप खासदाराच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

गुजरात पूल दुर्घटना : भाजप खासदाराच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

गांधीनगर | Gandhinagar

गुजरातच्या (Gujrat) मोरबी येथील मच्छू नदीवरील (Machhu River) पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. घटनेत १३२ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत...

दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यात येत आहे. अद्याप शोधकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेत राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्या परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांनी याबाबत सांगितले की, माझ्या बहिणीच्या परिवारातील एकूण १२ सदस्यांचा या दुर्घनटेत मृत्यू झाला आहे. यात पाच छोट्या मुलांचादेखील समावेश आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

बचावकार्य आणि मदतीविषयी बोलताना ते म्हणाले की, एनडीआरए, एसडीआरए तसेच स्थानिक प्रशासन नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. त्यासाठी काही रेस्क्यू बोटींची मदत घेण्यात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे कुंदारिया यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com