गुजरातमध्ये १२० किलो अंमली पदार्थ जप्त; ATS ची मोठी कारवाई

गुजरातमध्ये १२० किलो अंमली पदार्थ जप्त; ATS ची मोठी कारवाई

गुजरात | Gujrat

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोठी कारवाई केली आहे. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातून १२० किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे.

या अंमली पदार्थाची किंमत ६०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ही अंमली पदार्थ पाकिस्तानने सलाया बंदर सागरी मार्गाने भारतात पाठवली होती. ही अंमली पदार्थ मुंबई आणि गोव्यात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी गुजरात एटीएसनं दोन जणांना अटक केली आहे.

राज्याचे मंत्री हर्ष सांगवी यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. महिनाभर आधी तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रानंतर गुजरातध्येही ड्रग्जचं प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com