OTT प्लॅटफॉर्मसाठी नियमावली लवकरच ; प्रकाश जावडेकरांनी दिले संकेत

तांडव या वेबसीरिजबाबत नुकताच देशभरात वाद निर्माण झाला होता
प्रकाश जावडेकर
प्रकाश जावडेकर

दिल्ली l Delhi

तांडव या वेबसीरिजबाबत नुकताच देशभरात वाद निर्माण झाला होता. या वेब सीरिज विरुद्ध देशभर तक्रारी आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सीरिजच्या माध्यमातून हिंदूंच्या

भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार असल्याचे संकेत माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर बोलतांना म्हणाले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही मालिकाबद्दल आमच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सीरिज व डिजिटल न्यूजपेपर्स प्रेस कॉन्सिल कायदा, केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा वा सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत येत नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कामासंदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

तसेच, 'एक फेब्रुवाीरपासून देशभरातील चित्रपटगृहं कोरोना नियमांचे पालन करुन पूर्णपणे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वेळी बोलताना जावेडकर यांनी सांगितले, एक आनंदरवार्ता आहे. फेब्रुवारीपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये आपण चित्रपट पाहू शकता. चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने उघडण्यास मान्यता देण्या आली आहे. त्यासाठी तिकिटाचे बुकींग ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष खिडकीवरही घेऊ शकता. मात्र, हे सर्व करताना कोरोना व्हायरस नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही जावेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही म्हटले होते की, तांडव या वेबसीरिजबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा गृहमंत्र्यांनी म्हटले होते की, केंद्र सरकारला ओटीटी वर वेबसीरिज किंवा चित्रपट रिलीज होतात. त्यासाठी कायद्या करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन अशा घटना पुन्हा होणार नाहीत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com