आता मागील सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट लावणे अनिवार्य

नितीन गडकरी यांची माहिती
आता मागील सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट लावणे अनिवार्य

दिल्ली | Delhi

केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. कारच्या मागील आसनांवर बसलेल्या आणि सीट बेल्ट न लावणाऱ्या प्रवाशांनाही दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंगळवारी नितीन गडकरी यांनी केली.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या निधनानंतर सरकारने कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच, वाहनांमधील मागील आसनांच्या 'सीट बेल्ट'साठीही अलार्म बसवणे मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी बंधनकारक करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे पालघर जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात निधन झाले. पोलीस तपासात सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूची दोन कारणं कळली आहेत. मिनिटाला दोन किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने सुरू असलेला कारचा प्रवास हे अपघाताचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. कारचा अपघात झाला त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता.

मर्सिडिज कारमध्ये सर्व सीटसाठी दर्जेदार सीट बेल्टची व्यवस्था आहे. प्रवासात कारमध्ये बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावणे त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी आवश्यक आहे. पण सायरस मिस्त्री यांनी महामार्गावरून वेगाने प्रवास सुरू असतानाही सीट बेल्ट लावला नव्हता. ही चूक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमुख कारण ठरली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com