Google Chrome वापरताय? सरकारने युजर्सला दिलाय इशारा

Google Chrome वापरताय? सरकारने युजर्सला दिलाय इशारा

मुंबई | Mumbai

गुगल क्रोम (Google Chrome Browser) हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे ब्राउझर आहे. हे ब्राउझर विंडोज आणि अँड्रॉइडवर सर्वाधिक वापरले जाते. तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर सरकारने तुमच्यासाठी एक अलर्ट जारी केला आहे.

याबाबत IT मंत्रालयाचा भाग असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने माहिती दिली आहे. गुगल क्रोमचे जुने व्हर्जन वापरणा-यांना धोका असल्याचे या एजन्सीने म्हटले आहे.

Google Chrome मधील त्रुटींमुळे रिमोट अटॅकर्स Target System Security चा भंग करू शकतात. यामुळे तुमच्या सिस्टीमवरील पर्सनल डेटा हॅकर्स सहजरित्या चोरू शकतात.

Google Chrome चे 104.0.5112.101 आणि त्यापुढील व्हर्जन वापरणा-या युजर्सना याचा फटका बसत नसला तरी यापेक्षा जुने व्हर्जन्स वापरणा-या युजर्सना धोका असल्याचे CERT-In ने म्हटले आहे.

हा धोका लक्षात घेऊन या सरकारी एजन्सीने जुने व्हर्जन वापरणा-या युजर्सना आपले Google Chrome Browser अपडेट करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो, असेही या एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com