केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ

1.5 कोटी कर्मचार्‍यांना मिळणार लाभ
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ

नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात दरमहा 105 रुपये ते 210 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. 1 एप्रिल 2021 पासून ही वाढ लागू होणार आहे.

या वाढीमुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होणार आहे. महगाई भत्त्यात वाढीचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्थांमधील कर्मचारी, रेल्वे व्यवस्थापन, खाणकाम, तेल उत्पादन आणि प्रमुख बंदर येथील सरकारी कर्मचार्‍यांना लागू होणार आहे. याचा देशातील जवळपास 1.5 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com