'Bharat' On Google Maps: आता गुगल मॅप्सवर इंडिया ऐवजी दिसणार 'भारत'; सर्च केल्यानंतर तिरंगाही दिसतो

'Bharat' On Google Maps: आता गुगल मॅप्सवर इंडिया ऐवजी दिसणार 'भारत'; सर्च केल्यानंतर तिरंगाही दिसतो

मुंबई | Mumbai

केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) काही दिवसांपूर्वी देशाचे इंग्रजी नाव 'इंडिया' बदलून 'भारत' करण्याचे (Name Of India To Bharat) संकेत दिले होते. यावरून राजकारणही झाले. मात्र, अद्याप अधिकृतपणे हा बदल करण्यात आलेला जरी नसला तरी पण गूगल मॅपने (Google Maps) हे नवे नाव नक्कीच स्वीकारले आहे. यामागचे कारण म्हणजे जर तुम्ही गुगल मॅपच्या सर्च बॉक्स मध्ये भारत टाइप केला तर, तुम्हाला तिरंगा ध्वज दिसेल, ज्यावर दक्षिण आशियातील एक देश असे लिहिलेले दिसेल.

गूगल मॅपने इंडिया आणि भारत या दोन्ही नावांना 'दक्षिण आशियातील एक देश' म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे भारताचा अधिकृत नकाशा गूगल मॅपवर बघायचा असेल तर, आपण इंग्रेजी अथवा हिंदी भाषेत गूगल मॅपवर भारत अथवा इंडिया लिहून नकाशा पाहू शकता.

'Bharat' On Google Maps: आता गुगल मॅप्सवर इंडिया ऐवजी दिसणार 'भारत'; सर्च केल्यानंतर तिरंगाही दिसतो
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा जीव घ्यायचा आहे का? हंबरडा फोडत महिला आंदोलकाचा सरकारला सवाल

आपण गूगल मॅपच्या हिंदी व्हर्जनवर भारत टाइप केल्यास, आपल्याला भारताच्या नकाशासह 'भारत' बोल्ड अक्षरात लिहिलेले दिसेल. तसेच, आपण गूगल मॅपच्या इंग्रेजी वर्जनमध्ये जाऊन Bharat लिहिले, तर आपल्याला सर्च रिझल्टमध्ये देशाच्या नकाशासह India लिहिलेले दिसेल. मुळे, जर वापरकर्त्यांना भारताचा अधिकृत नकाशा गुगल मॅपवर पाहायचा असेल तर ते इंग्रजी किंवा हिंदीमध्ये गुगल मॅपवर भारत किंवा भारत लिहून करू शकतात.

गुगल मॅपवरच नाही तर टेक कंपनीच्या इतर प्लॅटफॉर्मवरही जर भारत आणि इंडिया लिहिले तरी त्याचे सर्च रिझल्ट अगदी सारखेच दिसत आहेत. अर्थात यूजर्सनी गूगल सर्च, गूगल ट्रान्सलेटर, गूगल न्यूज सारख्या अॅप्सवर जाऊन भारत अथवा इंडिया लिहिल्यास, त्यांना सेम रिझल्ट मिळत आहे. मात्र, आतापर्यंत गूगलकडून यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com