शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान उद्या करणार महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ
देश-विदेश

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान उद्या करणार महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विटर द्वारे दिली माहिती.

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कृषी पायाभूत सुविधा निधींतर्गत 1 लाख कोटी रुपयांची आर्थिक सुविधा सुरू करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 8.5 कोटी शेतकर्‍यांना 2000 रुपयांचा सहावा हप्ता म्हणून पंतप्रधान 17000 कोटीची घोषणा देखील करणार असल्याची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विटरवर दिली आहे.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, " पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत दुसरा हप्ता (वर्ष 2020-2021) साठी 8.5 करोड शेतकऱ्यांना 17000 कोटींचे हस्तांतर आणि 1 लाख कोटी रुपयांच्या कृषि पायाभूत सुविधा निधीचे उद्घाटन 9 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील."

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com