खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आज होणार 'सुपरमून'चे दर्शन

सुपरमून म्हणजे काय?
खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आज होणार 'सुपरमून'चे दर्शन

मुंबई | Mumbai

खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. आज चैत्र पौर्णिमा आहे. अवकाशात एक विलोभनीय घटना आपल्याला आज (मंगळवार) पाहायला मिळणार आहे.

अवकाशात आज वर्षातील पहिला सुपरमून म्हणजे सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही 'सुपरमून' पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असणार आहे. या 'सुपर मून' चे विशिष्ट म्हणजे पौर्णिमा २७ एप्रिलला असली तरी २६ ते २८ एप्रिल या तीन दिवस चंद्र जवळ जवळ पूर्ण दिसेल. चंद्र आणि पृथ्वीमधील यावेळेस अंतर ३ लाख ५८ हजार ६१५ किमी असेल.

चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर कमी जास्त होत असतं. यंदाचं पृथ्वी आणि चंद्रामधील सर्वात कमी अंतर २६ मे रोजीच्या सुपर मूनच्या दिवशी असणार आहे. सुपरमूनच्या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी दिसतो. खरं तर आजचा आणि २६ मे २०२१ चा सुपर मून हे दोन, जुळे सुपरमून आहेत. या दोन्ही दिवशी चंद्र आणि पृथ्वी मधल्या अंतरात फक्त १५७ किलोमीटरचा फरक असेल. आज सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवितानाच मोठ्या आकाराचा दिसेल.

सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही पण दुर्बिणीला फिल्टर लावून चंद्रा वरील विवरं पाहता येणार आहेत. खरोखरीचा अतिविशाल सुपरमून २६ जानेवारी १९४८ला दिसला होता; त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी. यापुढचे अतिशय मोठे सुपरमून २५ नोव्हेंबरर २०३४ रोजी आणि त्यानंतर ६ डिसेंबर २०५२ रोजी दिसतील.

सुपरमून म्हणजे काय?

पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून म्हणतात. चंद्राची पृथ्वीभोवती फिण्याची कक्षा लम्बवर्तुळाकार आहे. जेव्हा त्याचे पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर ४,०६,६९२ किलोमीटर असते, त्यावेळी तो अपोजी बिंदूवर असतो. तर कमीतकमी अंतर ३,५६,५०० किलोमीटर असताना तो पेरिजी बिंदूवर असतो. तेव्हा पौर्णिमा असते. जेव्हाजेव्हा चंद्र पृथ्वीपासून ३,६१,८८५ किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असतो, तेव्हाच्या पौर्णिमेला सुपरमून दिसतो. सुपरमून हा नेहमीच्या चंद्रापेक्षा सुमारे १४% टक्के मोठा आणि सुमारे ३० टक्के अधिक प्रकाशमान भासतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com