
दिल्ली | Delhi
सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात (GOld Silver rate today) आज पुन्हा घसरण झाली आहे.
देशात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७ हजार ३५० आहे, कालच्या दिवशी ४७ हजार ७५० होती. म्हणजेच एक तोळ्यामागे ४०० रुपयांची घट झाली आहे. तसेच देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ५१ हजार ६७० रुपये आहे. काल ही किंमत ५२ हजार १०० रुपये होती.
तसेच चांदीच्या दरात किलोमागे १ हजार ३०० रुपयांची घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर ६७ हजार ६०० आहे. त्याच वेळी, ही किंमत काल ६८ हजार ९०० होती.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
- २४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिले असते.
- २२ कॅरेटच्या दागिन्यांवर ९१६ लिहिले असते.
- २१ कॅरेट सोन्यावर ८७५ लिहिले असते.
- १८ कॅरेटच्या दागिन्यांवर ७५० लिहिले असते.
- १४ कॅरेटच्या दागिन्यांवर ५८५ लिहिले असते.