तीनच दिवसांत चांदीच्या रक्कमेत माेठी वाढ
देश-विदेश

तीनच दिवसांत चांदीच्या रक्कमेत माेठी वाढ

सोनेही महागले

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

सोने आणि चांदी महागले आहे. Gold silver expensive India कोरोना संकटामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती असल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. वायदे बाजारात ऑगस्ट महिन्यासाठी सोन्याच्या दरात 0.8 टक्के वाढ होत सोने 10 ग्रॅमसाठी 49 हजार 925 रुपयांवर पोहचले आहे. तर सप्टेंबर महिन्यासाठी चांदीचे एका किलोचे दर 59 हजार 635 रुपयांवर पोहचले आहेत. गेल्या तीन दिवसांत चांदीच्या किंमतीत 7 हजाराची वाढ झाली आहे. 7,000 increase in silver price in three days सुरुवातीच्या सत्रात चांदीची किंमत 6 टक्क्यांनी म्हणजे 3,400 रुपये प्रतिकिलोने वाढली तर सोमवारी 1150 रुपयांची वाढ झाली होती.

जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ दिसून आली आहे. world market Gold became more expensive गेल्या 9 वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत 1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, डॉलरचे घसरणारे मूल्य, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत असल्याने मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी आली आहे. आगामी काही दिवस सोन्याचे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com