मुंबई । Mumbai

सोन्याच्या (Gold Rate) दरात चढ-उतार सुरुच आहेत. दिवाळीपर्यंत ५० हजारांच्यावर

असलेले सोने तुळशीच्या लग्नादरम्यान ४८ हजारांवर आले होते. मात्र हळूहळू या किंमतीत पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

आज मुंबईत (Mumbai) सोन्याचा दर प्रतितोळा ४९ हजार ७२० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ४८ हजार ७२० रुपये इतका आहे. मागील काही दिवस सोन्याचा दर हा ४९ हजार ते ४९ हजार ५०० दरम्यान होता. मात्र यात थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान मुंबईत चांदीचा दर ६८ हजार २०० रुपये किलो इतका झाला आहे. चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत आहे.