सोने
सोने
देश-विदेश

सोन्याची घसरण सुरुच

वायदा बाजार अस्थिर

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

करोना संकट आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे वायदा बाजार अस्थिर झाला आहे. गत काही सत्रात उच्चांक स्तरावर गेलेल्या सोने व चांदीच्या दरात आणखी घसरण झाली आहे.

आज सोन्याच्या दरात 684 रुपयांची घसरण झाली असून दर 51,938 रुपये झाला आहे. चांदीच्या दरातसुद्धा 983 रुपयांची घसरण झाली असून सध्या चांदीचा दर प्रति किलो 66,980 रुपये आहे. Gold and silver prices

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आललेल्या आर्थिक संकटाच्या निमित्ताने तेजीत आलेले सोने आणि चांदीच्या दरवाढीला आळा बसला आहे. जागतिक बाजारपेठेतसुद्धा सोन्याचा दरात मोठी घसरण झाली आहे. गत आठवड्यात सोन्याचा भाव 116.96 डॉलर्सने कमी झाला. जागतिक बाजारात सोने दर प्रती औंस 5.67 टक्क्यांनी घसरून 1,944.45 डॉलर्सवर बंद झाला होता. तर डिसेंबरचा सोन्याचा भाव 5.67 टक्क्यांनी घसरून 1,953.70 डॉलर्स झाला होता. सध्या सोन्याचा भाव 1,940 डॉलर्स प्रती औंस आहे.

गुडरायटर या संकेतस्थळानुसार गुरुवारी मुंबईत 22 कॅरेट सोने- 51,990 रुपये, तर 24 कॅरेट सोने- 52,990 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोने- 51,860 रुपये, तर 24 कॅरेट सोने- 56,570 रुपये असे भाव आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोने- 52,530 रुपये, तर 24 कॅरेट सोने- 55,250 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने- 51,570 रुपये, तर 24 कॅरेट सोने- 56,250 रुपये आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com