Gold Rate Today : सोने-चांदी घसरले, जाणून घ्या नवे दर ​

gold prices
gold prices

दिल्ली | Delhi

बाजारात सोन्या-चांदीचे दर वारंवार बदलताना दिसत असतात. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापासुन सोन्याच्या दरात (Gold Price Today) घट होताना दिसत आहे. याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाली आहे.

भारतीय बाजारात सोन्याची किंमत सुमारे ४ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४६००० रुपयांनी घसरल्यानंतर ४ महिन्यांच्या नीचांकावर आला. बुधवारी एमसीएक्सवरील ऑक्टोबर वायदा सोने ०.१५ टक्के प्रति १० ग्रॅमच्या वाढीसह व्यापार करीत आहे. मात्र, सप्टेंबर फ्युचर्समध्ये चांदी ०.१४ टक्क्यांनी घसरली.

MCX वर ऑक्टोबर वायदा सोन्याचा भाव ०.१५ टक्के किंवा ६८ रुपयांच्या वाढीसह ४६,०३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करीत आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये MCX वरील सोन्याच्या वायदा किमतीत १.३ टक्के घट झाली.

चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. चांदीची किंमत ८९८ रुपयांनी घसरून ६१,७१५ रुपये प्रति किलोग्रॅम राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने लाभासह १७३५ डॉलर प्रति औंस झाले तर चांदी कोणत्याही बदलाशिवाय २३.५६ डॉलर प्रति औंसवर राहिली.

दरम्यान तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्याचा कालावधी चांगला आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. वर्षाअखेरपर्यंत गुंतवणूकदारांना सोन्यातून चांगला रिटर्न मिळेल असा अंदाज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com