सोन्याच्या दरात सात वर्षातील विक्रम
देश-विदेश

सोन्याच्या दरात सात वर्षातील विक्रम

करोनावर लस मिळेपर्यंत दर वाढत राहणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

सोन्याच्या दराने गेल्या सात वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढणार्‍या सोन्याच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. Gold prices आज सोन्याचा दर 51,946 रुपये प्रति तोळा म्हणजे 10 ग्रॅम इतका आहे. विशेष म्हणजे सध्या सराफा बाजारात फारसे गिर्‍हाईक नसतानाही सोन्याच्या भावाला अशी झळाळी आली आहे.

आज नवी दिल्लीमध्ये सोन्याच्या दरांत 502 रुपयांनी वाढ झाली. SILVER RATES तसेच दिल्लीमध्ये चांदीचे दर प्रति किलोमागे 61,225 रुपयांवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर international market 1,875 डॉलर तर, चांदी 21.80 डॉलरने वाढली आहे.

यावर्षी सोन्याच्या दरांमध्ये आतापर्यंत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. करोनावर लस मिळेपर्यंत हे सोन्याचे दर असेच वाढत राहण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com