सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

मुंबई / Mumbai - आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यामुळे भारतीय बाजारातही (Indian market) सोने-चांदीच्या दरात (gold and silver prices) घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 0.3 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा प्रतितोळा (प्रति 10 ग्रॅम) दर 47 हजार 776 रुपये इतका झाला आहे.

सहा दिवसांनंतर आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर, चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी घसरून 69 हजार 9 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. गेल्या सत्रात सोन्याचे दर 0.9 टक्क्यांनी वाढले होते तर चांदीच्या दरात 0.6 टक्क्यांची घसरण झाली होती. गेल्यावर्षीच्या सोन्याची सर्वाधिक किंमत 56 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. ते आता जवळपास 8 हजार 400 रुपयांनी घसरून 47 हजार 776 झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 0.4 टक्क्यांनी घसरून 1,797 डॉलर प्रति औंस झाले आहे. अमेरिकन डॉलर मजबूतीने सोन्या, चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. आशियाई एक्विटी बाजारांमध्ये आज घसरण झाली आहे, तर एसएंडपी 500 आणि नॅस्डॅक 100 दोन्ही सर्वाधिक उच्च स्तरावर बंद झाल्यानंतर अमेरिकेतील दर घसरले. इतर धातूमध्ये चांदी 0.2 टक्के स्वस्त होऊन 26.07 डॉलर प्रति औंस झाले आहे. तर प्लॅटिनम 0.5 टक्क्यांनी घसरून 1,080.37 डॉलर प्रति औंस झाले आहे.

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; 'या' मंत्र्यांकडे 'ही' खाती
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com