
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
गॉडविट जातीच्या पाच महिन्यांच्या पक्ष्याने नुकताच एक जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी अलास्काकडून त्या पक्ष्याने उड्डाण भरले. तब्बल ११ दिवस १ तासात त्याने १३,५६० किलोमीटर अंतर पार करत टास्मानिया गाठले...
या ११ दिवसांत त्याचा सरासरी वेग होता ५१ किलोमीटर/तास. या प्रवासात तो एकदाही झोपला नाही, त्याने काही खाल्लं नाही, त्याने पाणी प्यायलं नाही. तो फक्त आपल्या लक्ष्याकडे उडत होता.
अलास्कामध्ये त्याच्या पाठीवर बसवण्यात आलेल्या उपकरणाने त्याच्या या संपूर्ण प्रवासाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर हा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे.
गॉडविट नावाचे पक्षी स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे हवेतून तब्बल ८० किलोमीटर/तास वेगाने उडू शकतात. (उड्डाण करतात ग्लाइड न करता). तळ्याकाठी, मॅन्ग्रूव्हच्या जंगलात यांचं अस्तित्व दिसून येते.