Gmail Down : जाणून घ्या काय आहे प्रकरण !
देश-विदेश

Gmail Down : जाणून घ्या काय आहे प्रकरण !

यासंदर्भात मोठ्या संख्येने जीमेल यूजर्सने (gmail users) आपली तक्रार गुगलकडे नोंदवली आहे.

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

तांत्रिक आयुष्यातील सर्वाधिक गरजेजचे गुगलची (google) ई-मेल सेवा जीमेल (gmail) ने आज गृरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून काम करणे बंद केले.

यामुळे यूजर्स फारच त्रस्त झाले होते. यासंदर्भात मोठ्या संख्येने जीमेल यूजर्सने (gmail users) आपली तक्रार गुगलकडे नोंदवली आहे.

यूजर्सचं म्हणणं आहे की, ना ते एखादा मेल (mail) पाठवू शकत आहेत किंवा एखाद्या मेलवर फाइल अटॅच (file attach) करु शकत. काही यूजर्संना तर गुगल ड्राइव्ह (google drive), गुगल डॉक्स (google docs) सारख्या सेवांमध्येही अडचणी येत असल्याचे सांगितले. ही समस्या केवळ भारतातच नव्हे तर जपान, ऑस्ट्रेलियासह जगातील इतर देशांमध्येही येत असल्याचं समजतं आहे. लोक यूजर्स याबाबत ट्वीटरवरुन सतत तक्रारी करत आहेत.

याचा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. सध्या करोनाच्या काळात असंख्य व्यवसाय डिजिटल पद्धतीच्या आधारे सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com