पंजाब हादरले! चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ व्हायरल

खळबळजनक घटनेनंतर विद्यार्थिनी आक्रमक
पंजाब हादरले! चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ व्हायरल

दिल्ली | Delhi

पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातून (Chandigarh University) एक धक्कादायक घटना समोर आलीय. चंदीगड विद्यापीठामधील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने पंजाब हादरले आहे. (chandigarh mms)

या विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील (chandigarh news today) एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान हा प्रकार उघड होताच विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोर चांगलाच गोंधळ घातला. विद्यार्थ्यांनी 'वुई वॉन्ट जस्टिस'च्या घोषणा देत विद्यापीठाच्या गेटवर निदर्शने केली. (cu news today)

व्हिडीओ लीक झाल्यानंतर येथे काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मात्र पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला असून कोणीही आत्महत्या केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच पंजाबच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी चंदीगड विद्यापीठात पोहोचणार असून त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com