धडकी भरवणारा व्हिडिओ; दुचाकीवरील तरुणाने ओढणी ओढल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू…

धडकी भरवणारा व्हिडिओ; दुचाकीवरील तरुणाने ओढणी ओढल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू…

उत्तर प्रदेश | Uttar Pradesh

सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) एक संतापजनक आणि तितकाच भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आंबेडकरनगर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतून घरी परतणाऱ्या मुलींची दोन मुलांनी छेड (Youth Teasing Girl) काढल्यामुळे भयानक अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीची काही चूक नसताना दोन मुलांच्या दुष्कृत्यामुळे तिचा जीव गेला आहे. मोटारसायकलवरुन आलेल्या दोन आरोपींनी मुलीचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिची ओढणी खेचली. सायकलवर असणाऱ्या मुलीचा त्यामुळे तोल गेला आणि ती रस्त्याच्या उजव्या बाजूला ढकलली गेली.

धडकी भरवणारा व्हिडिओ; दुचाकीवरील तरुणाने ओढणी ओढल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू…
जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनीच...; नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

दरम्यान, पोलिसांनी मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोन तरुणांना आणि तिला धडक देणाऱ्या बाईकस्वाराला अटक केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलींची छेड काढणारे तरुण एकमेकांचे भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. हिरापूर बाजारपेठेत दुचाकीवरून आलेल्या या दोघा भावांनी सायकलवरुन जाणाऱ्या मुलींना अडविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मुलींनी थांबण्याऐवजी सायकलचा वेग वाढवला. यादरम्यान दोन्ही नराधमांनी एका मुलीची ओढणी ओढली, ज्यामुळे तिचा तोल गेला आणि तिची सायकल रस्त्याच्या मधोमध पडली. यावेळ मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीने रस्त्यावर पडलेल्या मुलीला जोराची धडक दिल्यायामुळे विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.

धडकी भरवणारा व्हिडिओ; दुचाकीवरील तरुणाने ओढणी ओढल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू…
Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यातून त्यांना घटनेची संपूर्ण माहिती मिळाली. सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांत विनयभंग आणि मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरसमहर येथील रहिवासी असलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे. तसेच मुलीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला देखील अटक केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com