गाझातील रुग्णालयावरील भीषण स्फोटात ५०० जणांचा मृत्यू; पॅलिस्टिनकडून इस्रायलवर गंभीर आरोप

गाझातील रुग्णालयावरील भीषण स्फोटात ५०० जणांचा मृत्यू; पॅलिस्टिनकडून इस्रायलवर गंभीर आरोप

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

इस्रारायल-हमास यांच्यातील युद्ध (Israel - Hamas War) दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे किमान ४५०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. यातच, इस्रायलने गाझातील एका रुग्णालयावर हल्ला केल्याचा (Attack On Hospital 500 Dead) दावा हमासने मंगळवारी रात्री उशिरा केला. या हल्ल्यात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही हमासच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

या हल्ल्यानंतर, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझातील रुग्णालयावरील या हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार असल्याचे वक्तव्य केले. “इस्रायलच्या सैन्याच्या प्रवक्त्याने एक वक्तव्य केले. त्यात त्याने रुग्णालय रिकामे करण्यास सांगितले. यातून त्यांनी रुग्णालय रिकामे करा किंवा रुग्णालयावर हल्ला होईल असा इशारा दिला. त्यामुळे या हल्ल्याला इस्रायल जबाबदार आहे आणि या गुन्ह्यासाठी ते खोट्या कथा तयार करून शकत नाही,” असे मत रियाद मनसूर यांनी व्यक्त केले.

पुढे ते असे ही म्हणाले,“नेतान्याहू खोटारडे आहेत. त्यांच्या डिजीटल प्रवक्त्यांनी गाझातील रुग्णालयाच्या परिसरात हमासचा अड्डा असल्याचे आणि इस्रायलने हल्ला केल्याचे ट्वीट केले. त्यानंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आले. आमच्याकडे त्या ट्वीटची एक कॉपी आहे. आता त्यांनी पॅलेस्टिनला बदनाम करण्यासाठी कथानक बदलले.”

गाझातील रुग्णालयावरील भीषण स्फोटात ५०० जणांचा मृत्यू; पॅलिस्टिनकडून इस्रायलवर गंभीर आरोप
Lalit Patil Arrested : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

दरम्यान, इस्रायली लष्कराने सांगितले की पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या दहशतवादी गटाने केलेल्या रॉकेट प्रक्षेपणामुळे हॉस्पिटलवर हल्ला झाला. आयडीएफचा यात कोणताही सहभाग नाही. मात्र, रुग्णालयावरील या हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यापासून ते संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने याचा निषेध केला आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही. ज्या लोकांनी आमच्या मुलांच्या निर्घृन हत्या केल्या, ते त्यांच्या मुलांच्याही हत्या करत आहेत.

आयडीएफने म्हटले आहे की, हमासने इस्रायलवर अनेक रॉकेट सोडले होते, ज्यापैकी एक अयशस्वी झाला आणि त्याने गाझामधील रुग्णालयाला लक्ष्य केले. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध गुप्तचर माहितीनुसार, रुग्णालयावरील या रॉकेट हल्ल्याला इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटना जबाबदार आहे.

दरम्यान, गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट होऊन जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतांचा खच पडला असून इमारतीच्या खिडक्या-दारेही तुटली आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. तर, त्यांच्या मृतदेहांशेजारी ब्लँकेट, शाळेच्या बॅगा आणि इतरस्त्र वस्तू पडल्या होत्या.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com