कुख्यात डॉन छोटा राजन करोनाबाधित

कुख्यात डॉन छोटा राजन करोनाबाधित
करोना

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गँगस्टर छोटा राजनला करोनाची लागण झाली आहे.

तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली. राजनची प्रकृती स्थिर असलायचे समजते. लक्षण आढळून आल्यानंतर छोटा राजनची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये छोटा राजनला करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने जानेवारीत गँगस्टर छोटा राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी त्याने मागितल्याचे समोर आले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com