VIDEO : 'गलवान' वीरांचा राष्ट्रपती भवनात सन्मान

VIDEO : 'गलवान' वीरांचा राष्ट्रपती भवनात सन्मान

दिल्ली | Delhi

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंगळवारी कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र (मरणोत्तर) प्रदान केले.

गेल्या वर्षी १५ जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैन्यासोबत लढतांना कर्नल संतोष बाबू यांनी भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या समारंभात कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी आणि आईने हा पुरस्कार स्वीकारला.

मरणोत्तर शौर्य पुरस्कार मिळालेल्या इतर गलवान वीरांमध्ये नायब सुभेदार नुदुराम सोरेन, हवालदार के पलानी, नाईक दीपक सिंग, शिपाई गुरतेज सिंग आणि हवालदार तेजिंदर सिंग यांचा समावेश आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यात सामना करताना त्यांच्या शौर्य, धाडसी कृती आणि आत्म-त्याग यासाठी या शूर वीरांना वीर चक्रांनी सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com