G20 Summit : जी २० परिषदेसाठी दिल्ली सज्ज, जगातील शक्तिशाली नेते आज भारतात... कशी आहे व्यवस्था?

G20 Summit : जी २० परिषदेसाठी दिल्ली सज्ज, जगातील शक्तिशाली नेते आज भारतात... कशी आहे व्यवस्था?

दिल्ली | Delhi

दिली येथील प्रगती मैदानावर उद्या पासून दोन दिवस जी - 20 शिखर (G 20 Summit) परिषद सुरू होणार आहे. या भव्य आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. प्रगती मैदान येथे भव्य मंडप उभारण्यात आला असून या ठिकाणी जगभरातील नेते आज येणार आहेत. २० पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष भारतात आज दाखल होणार असून त्यांच्या स्वागताची खास जबाबदारी ही मोदी सरकारने मंत्रिमंडळाला सोपवली आहे.

जगातील मोठ्या देशाचे प्रमुख राजधानी दिल्ली इथं असल्यानं सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी ५० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या ५० हजार जवानांसह, पॅरामिलिट्री फोर्स, एनएसजी आणि सीआरपीएफ कमांडो तैनात असतील. दिल्लीतील उंच इमारतीवर एअरक्राफ्ट गन मशीन लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी ४०,००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी फेस रेकगनिशन कॅमेरे लावण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एंटी ड्रोन सिस्टीम तैनात आहे. संभावित धोके ओळखून प्रत्येक हॉटेलमधून पाहुण्यांना काढण्यासाठी वायुसेनाचे चॉपर तयार आहेत.

काय आहे जी २० परिषद?

जी-२० सदस्य देशांचा समुह असून हा जागतिक GDP च्या अंदाजे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या बातीत ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतात. जी-२० देशांच्या परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे. जी-२० चे हे समीट शिखर परिषद म्हणून ओळखले जाते. या परिषदेत मुख्य दहशतवाद, आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर भर दिला जातो.

परिषदेला कोण कोण येणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक, जापान चे पंतप्रधान फिमियो किशिदो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बनीज, जर्मन चांसलर, फ्रांसचे राष्ट्रपति इमैनुएल मैक्रों, दक्षिण अफ्रीका, तुर्की आणि अर्जेंटीनाचे राष्ट्रपती भारतात येणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com