
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जपानमध्ये G-7 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांची लोकप्रियता 78 टक्के इतकी आहे....
22 देशांपैकी फक्त चार देशांच्या नेत्यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रियता आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एलेन बेर्सेट, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा समावेश आहे, एका सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे.
अमेरिकन फर्म मॉर्निंग कन्सल्टने 22 देशांमध्ये एक सर्वेक्षण केले. यावेळी जी-7 परिषदेत लोकप्रिय नसलेल्या नेत्यांची संख्या अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
अमेरिका, जपान, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आपापल्या देशातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांची लोकप्रियता कमी असल्याचा दावा केला आहे.
जर आता निवडणुका झाल्या, तर ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक हे मजूर पक्षाकडून पराभूत होतील, असे अलीकडील सर्वेक्षणातून दिसून आले आहे.