Fuel Rate : वाढता वाढता वाढे! सलग सहाव्या दिवशी देशात इंधनदरवाढ

Fuel Rate : वाढता वाढता वाढे! सलग सहाव्या दिवशी देशात इंधनदरवाढ

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार (Unemployed) झाले आहेत.

त्यातच ऐनसणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरच्या (Gas cylinder) वाढत्या किंमतींमुळे सर्व सामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यातच आता पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किंमतींमध्येही सतत भाववाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशात आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात (Diesel price today) प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, पेट्रोलच्या दरात (Petrol price today) ३० पैसे प्रति लिटर वाढ होऊन विक्रमी पातळीवर आहे.

या दरवाढीमुळे आज दिल्लीत पेट्रोल १०४.१४ रुपये प्रति लिटर आणि तर डिझेलचा ९२.८२ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल ११०.१२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल १००.६६ रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे १०४.८० रुपये आणि ९५.९३ रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.५३ रुपये लिटर आणि डिझेल ९७.२६ रुपये प्रति लीटरने खरेदी करावे लागत आहे. यात पुण्यातही पेट्रोलने १०९ रुपयांचा आकडा पार केला आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल दरात सतत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती तीन वर्षांत पहिल्यांदा ८०डॉलर प्रति बॅरल जवळपास पोहोचू शकतात. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू शकतात.

Related Stories

No stories found.