नवी दिल्ली -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केल्यानूसार टीडीएस, पीएफसह पाच नियमांमध्ये 1 एप्रिलपासून मोठे

बदल होणार आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 साठी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये आयकर प्रणालीसंदर्भात अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आला आहे. येत्या 1 एप्रिल पासून हे नवे नियम लागू होणार आहेत.

आयकराच्या नव्या नियमांनुसार 1 एप्रिल 2021 पासून वर्षाला 2.5 लाखांपेक्षा अधिक ईपीएफ कापला जात असल्यास त्यावर मिळणार्या व्याजावर कर लागणार आहे. 2 लाखांपेक्षा कमी पगार असलेल्यांना याचा कोणताही फरक पडणार नाही

कर्मचार्यांना सूट देण्यासाठी आणि आयकर भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी वैयक्तीक करदात्यांना आता 1 एप्रिल 2021 पासून आधीच भरलेला आयटीआर फॉर्म दिला जाणार आहे. यामुळे आयकर परतावा भरणे सोपे होणार आहे.

एलटीसी स्कीम

लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (एलटीसी) व्हाऊचर स्कीम नवीन वर्षात लागू होणार आहे. लॉकडाऊनमुळे ज्या कर्मचार्यांना एलटीसी टॅक्स बेनिफिट मिळू शकला नाही त्यांच्यासाठी ही योजा लागू केली आहे.

आयटीआर फाईल न केल्यास करदात्यांना दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. आयटीआर फाईल न करण्यार्यांसाठी हा नियम कडक केला आहे. तसेच त्यांना टीसीएसदेखील जास्त आकारण्यात येणार आहे.

तसेच सुपर सीनियर सिटीझन्सना आयटीआर फाइल करण्यास 1 एप्रिलपासून सूट दिली देण्यात येणार आहे. यासाठी 75 वर्षे वय निश्चित केले आहे. ही सवलत पेन्शन किंवा एफडीच्या व्याज घेणार्या वृद्धांसाठी दिली आहे.