COVID19 : 'या' देशात करोनाची पाचवी लाट, भारतातील स्थिती काय?

COVID19 : 'या' देशात करोनाची पाचवी लाट, भारतातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीनं (corona epidemic) जगभरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना करोनाची लागण (coronavirus) होऊन गेली आहे. त्यातील काहींना करोनावर मात करणं शक्य झालं तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान मध्यंतरी करोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला. तेव्हा जगभरातील विविध देशांनी आपल्या करोना परिस्थितीचा आढावा घेऊन कोविड निर्बंध हटवले होते. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर होतं. मात्र, आता पुन्हा काही देशांमध्ये करोना महामारीनं डोकं वर काढल्याचं चित्र दिसत आहे.

फ्रान्समध्ये (france) करोनाच्या पाचव्या लाटेला (5th wave of covid19) सुरुवात झाली आहे. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवर वेरन (French Health Minister Olivier Veran) यांनी यासंबंधी गंभीर इशारा दिला आहे. पाचव्या लाटेत करोना संक्रमण वेगाने होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. करोना लवकरच पूर्णपणे नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दावे केले जात असताना आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. दुसरीकडे जर्मनीतही करोना पुन्हा एकदा बळावला असून गेल्या २४ तासांत ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, भारतात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ११ हजार ८५० रुग्ण आढळले आहेत. तसेच ५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १२ हजार ४०३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घट झाली असून देशात सध्या १ लाख ३६ हजार ३०८ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २७४ दिवसांतील हा नीचांक आहे. देशभरात आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ३६ हजार ४८३ जण करोनातून बरे झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com