करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश
करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत

नवी दिल्ली / New Delhi - करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या (covid deaths) कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि या नुकसानभरपाईची रक्कम किती असावी हे केंद्र सरकारने स्वत: ठरवावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत.

करोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला (Central Government) झटका देत मोठा निर्णय दिला आहे. केंद्राने करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देऊ शकत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जाहीर केला आहे.

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत
राज्यात लवकरच घरोघरी लसीकरण

करोना मृत्यूंच्या नुकसान भरपाईसाठी याचिकेत 4 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती पण सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देणे शक्य नसल्याचे मान्य केले. मात्र नुकसानभरपाई द्यावीच लागेल असा आदेशही दिला आहे तसेच याबाबत आठवड्यांच्या आत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत
‘त्या’ 727 पोलीस अधिकार्‍यांची मुंबईबाहेर बदली
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com