
नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) काझीगुंड (Qazigund) येथे भरधाव व्हॅनला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात (A Terrible Accident) घडला आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू (Death) झाला असून अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत (Jammu-Srinagar National Highway) असणाऱ्या लेव्हडोरा परिसरात ( Levadora Area) व्हॅन आणि ट्रकचा (Van and Truck) हा भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. लेन बदलतांना भरधाव ट्रकने व्हॅनला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
तसेच अपघातानंतर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले असून त्यात दिसत आहे की, महामार्गावर भरधाव वेगाने वाहनांची वर्दळ सुरू आहे. तेवढ्यात एक व्हॅन लेन बदलण्यासाठी रस्त्याच्या (Road) मध्यभागी आली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीमधील सर्वजण बाहेर फेकले गेले आणि गाडी उलटली.
दरम्यान, या अपघातानंतर सर्वांना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच चौघांचा मृत्यू झाला. तसेच याप्रकरणी काझीगुंड पोलीस ठाण्यात (Qazigund Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.