Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली | New Delhi

बिहारमधील (Bihar) बक्सर भागात (Buxar Area) दिल्लीहून गुवाहाटीला (Delhi to Guwahati) जाणाऱ्या नॉर्थ-ईस्ट एक्सप्रेसचे (North-East Express) तब्बल २१ डब्बे रुळावरुन घसरल्याने भीषण अपघात (A Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत चार प्रवाशांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे...

Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो व्हायरल; दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर नॉर्थ-ईस्ट एक्सप्रेस बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आली असता दानापूर विभागातील (Danapur Division) रघुनाथपूर स्टेशनजवळ दोन एसी डब्यांसह २१ डबे रुळावरुन घसरले. २३ डब्यांची ही ईशान्य क्रमांक १२५०६ डाउन एक्स्प्रेस सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी दिल्लीतील आनंद विहार (Anand Vihar) येथून रवाना झाली होती. त्यानंतर रघुनाथपूर स्टेशनजवळ रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर तातडीने या ठिकाणी रुग्णवाहिका, डॉक्टर्स पाठवत मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले.

Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
CM Eknath Shinde : "एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं"; शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान

दरम्यान, या अपघातानंतर जखमींना पुढील उपचारासाठी पाटणा (Patna) येथील आयजीआयएमएस रुग्णालयात (IGIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या काही प्रवाशांनी त्यांची आपबिती सांगितली आहे. यातील मोहम्मद नासिर नावाच्या प्रवाशानं सांगितले की, आम्ही दोघेजण होतो. B7 बोगीत होतो. आम्ही जेवून झोपलेलो. काही कळण्यापूर्वीच अपघात घडला. सगळं क्षणार्धात घडलं. काहीच कळालं नाही.बोगीमध्ये किती लोक होते? हे सांगणं कठीण आहे. रेल्वेच्या डब्यातून अनेक प्रवासी प्रवास करत होते. माझ्याबरोबर माझे सहप्रवासी असलेल्या अबू जैद यांचा अपघातात मृत्यू झाला आहे असे त्यांनी म्हटले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
Sushma Andhare : "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com