
तामिळनाडू | Tamil Nadu
तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एक धक्कादायक भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या उत्सवात क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमधील राणीपेट जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या इथं किलीवेडी गावात ही घटना घडली आहे. किलीवेडी गावात मंडियमम्न मंदिर मैलार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो भाविका या मेळाव्यात हजर होते. (Tamil Nadu crane collapsed video)
या उत्सवादरम्यान, एका क्रेनच्या मदतीने भलामोठा हार आणला होता. धक्कादायक म्हणजे, क्रेनला जिथे हार लटकलेला होता, त्यावर काही तरुण उभे होते. पण, अचानक क्रेन डाव्या बाजूला सरकली तेव्हा तोल जाऊन क्रेन खाली आदळली.
या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत हा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. क्रेन उलटताच घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. अनेक जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर ९ जण या अपघातात जखमी झाले.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले. या अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.