दिल्ली । Delhi

माजी केंद्रीय मंत्री, राजस्थानचे माजी खासदार आणि कॉंग्रेस नेते बूटा सिंग यांचं शनिवारी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते ८६ वर्षाचे होते.

पंजाबच्या जालंधरमधील मुस्तफापूर गावात जन्मलेल्या बूटा सिंग ८ वेळा लोकसभेचे खासदार होते. त्यांची ओळख पंजाबमधील प्रमुख दलित नेता म्हणून झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. दीर्घ आजारामुळे आज शनिवारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

२१ मार्च १९३४ मध्ये पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील मुस्तफापूर गावात बुटा सिंग यांचा जन्म झाला होता. ते 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. बुटा सिंग हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बुटा सिंग काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. राष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहतानाच दलितांचे नेते म्हणूनही त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली होती. ते 1978 ते 1980 या काळात काँग्रेसचे महासचिव होते. यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले. मात्र, डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार येताच त्यांना बिहारचे राज्यपाल करण्यात आले होते.