दिल्ली | Delhi

देशातील शेतकऱ्यांचे कृषीकायदेविरोधी आंदोलन सातत्याने जोर धरत आहे आणि सरकार याप्रकरणाचा इलाज शोधण्यात व्यस्त आहे आणि यासाठी कृषी आंदोलनातील नेत्यांशी चर्चा चालू आहे. याचदरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री

आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख, वरिष्ठ नेते प्रकाश सिंह बादल (Prakash Singh Badal) यांनी शेतकरी कायद्यांच्या विरोधात आपला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारवर टीका करत प्रकाश सिंह बादल यांनी त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपतींना एक पत्रही लिहिले आहे.

प्रकाश सिंह बादल यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, 'मी इतका गरीब आहे की माझ्यासाठी शेतकऱ्यांसाठी बलिदान देण्याशिवाय दुसरे काही नाही, मी जे काही आहे ते शेतकर्यांमुळे आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर कोणत्याही प्रकारचा सन्मान ठेवण्यात काही उपयोग नाही.' अकाली दलाने कृषी कायद्यांचा निषेध नोंदवतच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

कृषी कायद्यांचा निषेध नोंदवत सध्या पंजाब, हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. हे कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी तर निषेध म्हणून मोदी सरकारचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांना चर्चेचं निमंत्रण देत सरकारने बैठक घेतली. त्यातल्या पहिल्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही.