माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण
देश-विदेश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण

त्यांनी स्वतः ट्विटर द्वारे दिली माहिती

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात अनेक मंत्री, नेते, कलाकार यांना देखील करोनाची लागण झाली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील करोनाची लागण झाली आहे. या बाबत त्यांनी स्वतः ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, "मी इतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेलो होतो. रुग्णालयात करोना चाचणी केली होती. करोना चाचणीचा अहवाल आला असून करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलीगीकरणात तसेच कोरोना चाचणी करावी" असे आवाहन त्यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com