जम्मू-काश्मीरच्या माजी उपराज्यपालांनी घेतली "या" पदाची शपथ !

मुर्मू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील अधिकारी
जम्मू-काश्मीरच्या माजी उपराज्यपालांनी घेतली "या" पदाची शपथ !
जम्मू-काश्मीरच्या माजी उपराज्यपालांनी घेतली "या" पदाची शपथ !
...यांची जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मीरचे माजी उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मोदी सरकारने त्यांना एक नवीन जबाबदारी दिली आहे. मुर्मू यांना देशाच्या CAG (Comptroller and Auditor General of India) पदी नियुक्त करण्यात आले आहे. आज त्यांचा शपथ विधी पार पडला आहे.

गिरीश चंद्र मुर्मू यांनी राजीव महर्षी यांची जागा घेतली आहेत. २०१७ साली राजीव महर्षी यांना CAG पदी नियुक्त केले होते. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा होता. ६० वर्ष वय असलेले मुर्मू हे १९८५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. ते गुजरात कॅडर अधिकारी आहेत. मुर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू-काश्मीरचे पहिले उपराज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांनी बुधवारी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी ९ महिने हा कार्यकाळ सांभाळला. मुर्मू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते त्यांचे प्रमुख सचिव होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com