‘त्या’ तरुणीवर बलात्कार झालाच नाही : उत्तर प्रदेश पोलीस

हथरस बलात्कार प्रकरण
‘त्या’ तरुणीवर बलात्कार झालाच नाही : उत्तर प्रदेश पोलीस

हथरस -

उत्तर प्रदेशातील हथरस येथील त्या 19 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही. तिचा मृत्यू

गळ्याला जबर मार (दुखापत) लागल्याने आणि त्यामुळे बसलेल्या धसक्याने झाला आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालावरूनही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट होते, असा दावा उत्तर प्रदेश पोलीसचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी केला आहे.

ते म्हणाले, घटनेनंतर संबंधित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीतही आपल्यावर बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते. तिने केवळ मारहाण झाल्याचा आपोरच केला होता. एवढेच नाही, तर सामाजिक सौहार्द खराब करण्यासाठी आणि जातीय हिंसाचार निर्माण करण्यासाठी काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. पोलिसांनी हाथरसप्रकरणी तत्काळ कारवाई केली आणि आता आम्ही ज्या लोकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यात जातीय हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचा शोध घेणार आहोत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून याच्या तपासासाठी विशेष शोध पथक तयार केले. एवढेच नाही, तर या घटनेत ज्यांचा समावेश आहे. त्यांना कदापी क्षमा केली जाणार नाही. मृवैद्यकीय अहवाल येण्यापूर्वी सरकारविरोधात चुकीची वक्तव्ये करण्यात आली आणि पोलिसांची प्रतिमा मलीन केली गेली. हे सर्व कुणी केले याचा आम्ही शोध घेणार आहोत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि सरकार तथा पोलीस महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत.

14 सप्टेंबरला झाली होती घटना -

एडीजी म्हणाले, आकडेवारीचा विचार केल्यास, 2018 आणि 2019मध्ये, महिलांसंदर्भातील गुन्हांत शिक्षा देण्यात उत्तर प्रदेश अव्वल आहे. गेल्या 14 सप्टेंबरला हथरस जिल्ह्यातील चंदपा परिसरात 19 वर्षांच्या एका मुलीवर कथीत बलात्कार केल्याचे म्हटले जात आहे. घटनेच्यावेळी तिचा गळा दबण्यात आला. याच वेळी तिची जीभही तुटली होती.

घटनेनंतर संबंधित तरुणीला अलिगड येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर तिला दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले, येथेच मंगळवारी तिचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली आणि आता यावरून राजकारणही तापले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com