नवी दिल्ली -

भारत-अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंधामुळे सीमारेषेवर भारताची स्थिती मजबूत असल्याची माहिती तज्ज्ञांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना दिली. त्यामुळेच चीन आपले

सैन्यबळ वाढविण्यासाठी लाखो युवकांना जबरदस्तीने सैन्यात दाखल करून घेत आहे तसेच भारताने लडाख सीमेवर जबरदस्त तयारी केल्यामुळे चीन अस्वस्थ झाला आहे.

एका वृत्तानुसार, कम्युनिस्ट पार्टीमधील भारत विषयक घडामोडींची माहिती असणार्या लोकांना सीमारेषेवरील विविध भागात दौर्यावर पाठविले होते. या दौर्यावरील एका सदस्याने चायनीज पत्रिका या संस्थेला मुलाखत दिली. त्यातून ही माहिती उघडकीस आली.

चीनसाठी अमेरिका सर्वात जास्त धोकादायक होता. मात्र, भारत व अमेरिका एक झाले आहेत. त्यामुळे सीमारेषेवर अनेक ठिकाणी भारताची स्थिती मजबूत झाली आहे, असा अहवाल कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी दिल्याने चीनची घाबरगुंडी उडाली आहे.

चीनचे सैन्य- पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख युवक सैन्यात दाखल होतात. यावर्षी विद्यापीठांतून बळजबरीने 30 लाख पदवीधर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले आहेत. दरम्यान, 15 जूनला पूर्व लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय सैन्यांसोबत झालेल्या संघर्षात चीनने फक्त 5 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे.