होऊ द्या खर्च! आता बस उडणार हवेत; गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट

नितीन गडकरी
नितीन गडकरी

प्रयागराज | Prayagraj

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी प्रयागराज शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत एक मोठे आश्वासन दिले आहे...

या जाहीर सभेत गडकरींनी दिलेले आश्वासन चर्चेचा विषय ठरत आहे. नितीन गडकरी म्हणाले की, आता प्रयागराजमध्ये हवेत उडणारी बस (flying bus) चालवली जाईल. ज्याचा डीपीआर (DPR) तयार केला जात आहे.

या योजनेबाबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनादेखील कळवले असल्याचे गडकरी म्हणाले. दिल्लीहून (Delhi) प्रयागराजला सी प्लेनमध्ये बसून त्रिवेणी संगम येथे उतरू, ही आपली इच्छा आहे. एका नव्या युगाच्या विकासाची ही गोष्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, सी-प्ले, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक प्रकल्प नियोजित आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रस्ते (Roads) अमेरिकेतील रस्त्यांसारखे (Roads in America) असणार आहेत. आतापर्यंत यूपीत (UP) झालेली विकासकामे ही तर केवळ ट्रेलर आहेत.

आपल्याकडे निधीची (Fund) कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. प्रयागराजमध्ये बांधण्यात येत असलेला रिंग रोड आणि गंगा नदीवरील (Ganga River) पूल हा २०२४ पर्यंत बांधून पूर्ण होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.

हायड्रोजन इंधनाचादेखील (Fuel) वापर केला जाणार आहे. राज्यात ऊसाचे उत्पन्न मुबलक प्रमाणात घेतले जाते. उसाच्या मदतीने इथेनॉल तयार केले जाईल, जे वाहनांत टाकण्यात येईल.

सध्या जी वाहने ११० रुपये लिटर पेट्रोलवर चालतात, त्यात इथेनॉलच्या वापरामुळे हा खर्च ६८ रुपयांपर्यंत खाली येणार आहे. मी जे बोलतो ते करतो, असे गडकरी यांनी प्रयागराज शहर पश्चिम भाजपचे विद्यमान आमदार आणि यूपीचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com