Jammu & kashmir : जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांसोबत चकमक, पाच जवान शहीद

Jammu & kashmir : जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांसोबत चकमक, पाच जवान शहीद
File Photo

दिल्ली l Delhi

जम्मू- काश्मीरमधून (Jammu Kashmir) एक मोठी बातमी समोर येत असून भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी (Terrorist) चकमक झाली आहे. या चकमकीत जेसीओसह (JCO) पाच जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

चकमकीत हे पाचही जवान गंभीर जखमी झाले होते. मात्र, त्यानंतर, काही तासांनी त्यांना वीरमरण प्राप्त झालं. जम्मू -काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात ही चकमक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ४ दहशतवाद्यांनी सीमा पार करुन पूँछला जिल्ह्यात घुसखोरी केली होती. त्यानंतर हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याच्या दिशेनं रवाना झाले.

दरम्यान सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.