VIDEO : नामिबियातून भारतात येणाऱ्या चित्त्यांची पहिली झलक पाहिलीत का?

VIDEO : नामिबियातून भारतात येणाऱ्या चित्त्यांची पहिली झलक पाहिलीत का?

दिल्ली | Delhi

भारतातून १९५२ मध्ये चित्ता नामशेष झाला. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. त्यानंतर आशियात इराणमध्येच चित्त्याचं वास्तव्य होतं.

आता तब्बल ७० वर्षांनंतर भारतात चित्ते येणार आहेत. उद्या (१७सप्टेंबर) नामिबियातून ८ चित्ते भारतात आणले जाणार आहेत. नामिबियातील या चित्त्यांना विशेष चार्टर विमानाने ग्वाल्हेरला आणण्यात येणार आहे. नामिबियातून आणल्या जाणाऱ्या या चित्त्यांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान या चित्त्यांना आणण्यासाठी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे खास विमान दाखल झाले आहे. विशेष म्हणजे या विमानावर चित्त्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे. हे विमान १६ तासांपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम असल्याने ते इंधन भरण्यासाठी न थांबता थेट नामिबियापासून भारतापर्यंत उड्डाण करणार आहे. भारतात येणाऱ्या पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले असून रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com