पाच राफेल विमाने 29 जुलैला भारतात
देश-विदेश

पाच राफेल विमाने 29 जुलैला भारतात

लडाखमध्ये तैनातीची शक्यता

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi - शत्रूला धडकी भरवणारे पाच राफेल विमानने 29 जुलैला भारतीय वायुदलात Indian Air Force (IAF) समावेश केला जाणार आहे, असे वायुदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय वायुदलात या विमानाचा समावेश सोहळा ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात होणार आहे.

29 जुलैला पाच राफेल लढाऊ विमानांचा समावेश असलेली पहिली तुकडी भारतात येणार आहे. हवामान योग्य असल्यास भारतीय वायुदलाच्या अंबाला येथील तळावर या विमानांचा वायुदलात समावेश केला जाईल, भारतीय वायुदलाने म्हटले आहे.

अत्याधुनिक शस्त्रास्त्र यंत्रणा हाताळण्यासह भारतीय वायुदलाच्या कर्मचार्‍यांना सर्वंकष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही विमाने देशात दाखल झाल्यानंतर तातडीने क्रियान्वित करण्यावर भर दिला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

चीनसोबत सुरू असलेला सीमावाद पाहता ही विमाने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात तैनात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राफेलचे क्रियान्वयन आणि तैनातीचा आढावा वायुदलाचे वरिष्ठ कमांडर बुधवारपासून सुरू होणार्‍या तीन दिवशीय परिषदेत घेणार आहेत, असे वायुदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या परिषदेत येत्या काही दशकांत वायुदलाची क्रियान्वयन क्षमता वाढवण्याबाबतचा आढावा देखील या परिषदेत घेतला जाणार आहे. राफेल विमानाच्या समावेशामुळे भारतीय वायुदलाच्य युद्ध क्षमतेत भर पडणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com