
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पंजाबच्या बठिंडा येथील मिलिट्री स्टेशनमध्ये आज पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली असून यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही...
यानंतर परिसरात तत्काळ लष्कराचे पथक दाखल होऊन शोध सुरु करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात घेराव घालण्यात आला आहे. सध्या शोध मोहिम सुरू आहे.
भटिंडा मिलिटरी स्टेशन शहराला लागून आहे. हे एक जुने आणि खूप मोठे मिलिटरी स्टेशन आहे. पूर्वी ते शहरापासून थोडे लांब होते, परंतु शहराच्या विस्तारामुळे आता मिलिटरी स्टेशन रहिवासी भागाच्या जवळ आले आहे. या मिलिटरी स्टेशनच्या बाहेर कोणत्याही सामान्य वाहनाने जाता येते.