कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे डेल्टाचा संसर्ग होण्याची भीती

कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे डेल्टाचा संसर्ग होण्याची भीती

मुंबई / Mumbai - करोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लसबाबत अमेरिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे डेल्टाचा संसर्ग पसरत असल्याचे या अहवालात सांगितले आहे.

डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत म्हणाले, भारतात आढळलेला डेल्टा विषाणू हा मानवांमध्ये गंभीर आजार निर्माण करत असल्याची माहिती समोर आली आहे.

करोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेले अशा दोन्ही गटाकडून या विषाणूचा प्रसार केला जाऊ शकतो. डेल्टाची लक्षणे मूळ कोविड -19 विषाणूच्या लक्षणांपेक्षा भिन्न असू शकतात. एक विषाणू स्वतःच आपली रूपे बनवितो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com