आता FASTag ने ही भरता येणार पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या कसे

आता FASTag ने ही भरता येणार पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या कसे

दिल्ली l Delhi

आता तुम्हाला FASTag च्या माध्यमातून पेट्रोल पंपावर (Petrol pump) इंधन भरता येणार आहे. डिजिटल पेमेंटमुळे (Digital payment) काही गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. त्यामुळे आधी आपल्याला पैसे घेऊन कुठेही जावे लागत होते. पण आता डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध असल्याने फक्त एका कार्डच्या माध्यमातून किंवा एका क्यूआर कोडच्या (QR code) सहाय्याने एखाद्याला पैसे अगदी सहज देता येतात. पण सध्या तुमचा स्मार्टफोनच (Smartphone) आता एखाद्या एटीएम (ATM) सारखे काम करु लागले आहे.

इंडियन ऑईल (Indian Oil) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) यांनी एका विशेष सुविधेसाठी हात मिळवला आहे. याअंतर्गत आपण इंडियन ऑईलच्या सर्व पेट्रोल पंपांवर कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट (cashless and contactless payment) करण्यास सक्षम असाल. आयसीआयसीआय बँकेच्या फास्टॅग वापरकर्त्यांना इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर पूर्णपणे डिजिटल अनुभव घेता येणार आहे.

यामध्ये, ग्राहकांच्या वतीने डिझेल-पेट्रोलचे पेमेंट थेट त्याच्या फास्टॅगद्वारे केले जाईल. फक्त हेच नाही, तर तुम्ही फास्टॅग च्या माध्यमातून लुब्रिकेंट्सचे (lubricants) पैसे देखील देऊ शकाल. या विशेष उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एकूण ३००० इंडियन ऑइल रिटेल आउटलेट्स कव्हर करण्यात येतील.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रथम ग्राहकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या कर्मचार्‍यांना सांगावे लागेल की, FASTag द्वारे तुम्हाला पैसे द्यायचे आहे. यानंतर कर्मचारी आपल्या कारवर स्थापित FASTag स्कॅन करेल, त्यानंतर आपल्या फोनवर एक ओटीपी (OTP) येईल. जेव्हा या ओटीपी पीओएस मशीनमध्ये प्रवेश केला जाईल. तेव्हा तुमचा व्यवहार पूर्ण होईल.

FASTag एक स्टिकर आहे, जे आपल्या वाहनाच्या समोरच्या स्क्रीनवर लावले जातात. जेव्हा आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना कोणत्याही टोलमधून जाता, तेव्हा तेथे स्थापित स्कॅनर डिव्हाइस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (Scanner device radio frequency identification) तंत्रज्ञानाद्वारे वाहनवरील स्टीकर स्कॅन केले जाते. मग त्या टोलवर असलेले पैसे वजा केले जातात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com